मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

दारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा: डॉ. अभय बंग

Saturday, 13th October 2018 12:58:39 AM

गडचिरोली, ता.१३ : बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्माण होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषधनिर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण, रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील, हे ध्येय समोर ठेवणे जास्त आवश्यक

आहे. यासाठी सर्व औषध कंपन्यांनी अल्काहोल आणि तंबाखू या व्यवसायांना नाही म्हणत त्यांचा विरोध करावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.

आदिवासींच्या आरोग्यासाठी 'सर्च' संस्थेच्या माध्यमातून काम करणारे डॉ. अभय आणि राणी बंग यांना ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स ऑफ इंडियाच्या वतीने 'लाईफटाईम अचिव्हमेंट' पुरस्काराने ११ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे वार्षिक दिवस कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग आणि सर्च च्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग, ओप्पीचे अध्यक्ष वैधीश, महासंचालक कंचना टिके यांच्यासह भारतातील सर्व औषध कंपन्यांचे राष्ट्रीय प्रमुख उपस्थित होते. औषधशास्त्रात नवे शोध करणाऱ्या वैज्ञानिकांनाही विविध पुरस्कारांनी या सोहळ्यात गौरविण्यात आले. 

वैद्यकीय समाजसेवेची प्रेरणा असलेले गांधी आणि गडचिरोली या दोन गुरूंना डॉ. बंग यांनी हा पुरस्कार अर्पण केला.

यावेळी ते म्हणाले, महात्मा गांधींनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग कुठे करायचा, हे सांगत वैद्यकीय ज्ञान आणि जीवनाला नवीन हेतू दिला. त्यांच्या या विचारातूनच मला गडचिरोलीच्या खेड्यांमध्ये जाऊन लोकाच्या समस्या समजून घेत त्याचे समाधान शोधण्याची संधी मिळाली.ओप्पी ला उद्देशून ते म्हणाले, औषध हे रोग बरा करण्यासाठी असतात. आज अल्कहोल आणि तंबाखू ही रोगानिर्मितीची प्रमुख करणे झाली आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डीसीसमधील संशोधनानेही रोगानिर्मितीच्या सात मुख्य कारणांमध्ये दारू आणि तंबाखूचे सेवन हे दुसऱ्या स्थानावर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे औषध कंपन्यांनी दारू आणि तंबाखू व्यवसायाचा विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40V06
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना