शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

४० हजारांची लाच स्वीकारणारा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11th October 2018 08:06:45 AM

गडचिरोली, ता.११: फर्निचर बनविण्यासाठी जंगलातून सागवान लाकूड आणणाऱ्या इसमाकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा(कं) बिटाचा वनपाल रमेश पन्नू बलय्या(३२) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा मुलेचरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रहिवासी असून, मिस्त्रीकाम करतो. त्याचा भाऊ मोटारसायकलने सागवान लाकूड आणत असताना वनपाल रमेश बलय्या याने त्यास पकडले. त्यानंतर तक्रारकर्ता हा वनपाल रमेश बलय्या यास भेटला असता बलय्या याने गुन्ह्यात सवलत देऊन मोटारसायकल परत देण्याकरिता त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली.

मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता, वनपाल रमेश बलय्या यास तक्रारकर्त्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(अ)अन्वये चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र दुधलवार, राजेंद्र नागरे, विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकर, तुळशीदास नवघरे,घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, साेनी तावाडे यांनी ही कारवाई केली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DV41U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना