रविवार, 16 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  जादुटोण्याच्या संशयावरुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास पाच वर्षांचा सश्रम कारावास-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             धानाच्या योग्य हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करावा: गुरवळा येथील कार्यक्रमात शेकाप नेत्या जयश्री वेळदा यांचे आवाहन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

नक्षल्यांनी केली युवतीची हत्या?

Sunday, 7th October 2018 03:27:54 AM

गडचिरोली, ता.७: भामरागड तालुक्यातील इरपनार येथील एका युवतीची नक्षल्यांनी हत्या केल्याने खळबळ माजली आहे. बेबी मडावी(२२)असे मृत युवतीचे नाव आहे.

काल(ता.६)सकाळी बेबीचा मृतदेह परायणार क्रॉसिंगजवळ आढळून आला. बेबी मडावी ही चार दिवसांपूर्वी ती घरुन निघून गेली होती. ५ ऑक्टोबरच्या रात्री तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली. घटनास्थळी नक्षली पत्रक आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. बेबी मडावी ही पोलिस भरतीत सहभागी झाली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. मात्र, बेबीची हत्या नक्षल्यांनीच केली कि अन्य कुणी, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. धोडराज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QARSE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना