शनिवार, 16 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  मोटारसायकल नदीत कोसळून दोघांचा मृत्यू-अहेरीनजीकच्या वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीघाटावरील घटना             डॉ.रमेश गजबे असतील वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार-चिमूरच्या सभेत अॅड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा             जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागात गारपिटीमुळे रब्बी पिकाचे नुकसान             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

आदिवासी विद्यार्थी संघाच्या मोर्चाची महावितरण कार्यालयावर धडक

Saturday, 6th October 2018 12:49:38 PM

कुरखेडा, ता.६: भारनियमन तातडीने बंद करुन कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

महात्मा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. तालुक्यात मागील काही दिवसांपासून अघोषित भारनियमन व कमी दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात येत असल्याने कृषी पंप निकामी ठरत असून, धान पीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अखंडित विद्युत पुरवठा करण्यात यावा, कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करावा, कृषिपंपांना तत्काळ वीज जोडणी द्यावी, मालेवाडा येथील महावितरणद्वारे युवकांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्यावे या प्रमुख मागण्यांकरिता मोर्चेकरी आक्रमक झाले होते. मोर्चाला महावितरण कार्यालयाबाहेर अडविण्यात आले. यावेळी गडचिरोली कार्यालयाचे उपविभागीय अभियंता तेलतुंबडे व कूरखेड्याचे उपविभागीय अभियंता मुरकूटे यांनी मोर्चाला सामोरे जात चर्चा केली. आपल्या अधिकाराखालील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकऱ्यांचा रोष कमी झला.

मोर्चाचे नेतृत्व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे, कांग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, शिवणीचे माजी जमीनदार साबू सेठ, दौलत कुमोटी यांनी केले. या मोर्चात प्रामुख्याने  माजी पंचायत समिती सदस्य आनंद बोगा, सरपंच उमाकांता मडावी, शशीकला कुमरे, तुलसी हारामी,किरण तलांडे, मनेश लेनगुरे, सुरेखा वनस्‍कर, जागृती मडावी, दिलीप नैताम, सदाराम काटेंगे, महादेव हिडको, शालीक मडावी, ऋषी हलामी, सदु हलामी, शेषराम मसराम, आनंद कपूर, श्रावण कसनकर, हिरामण लंजे, वासुदेव डोंगरवार, नीळकंठ गावळ, सोमनाथ मसराम, लक्ष्मण डोंगरवार, मुस्तफा शेख, अशोक टेंभुर्णे, जानू मडावी, शामराव नरोटे, अंताराम गोटा, माणिक कमरो, चमरु भैसा, हरिपाल तोफा, सुरजू पुराम ,हरिश्चंद्र ढोरे, मन्साराम नैताम, नामदेव धुर्वै तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेदार सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4U150
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना