शनिवार, 16 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  मोटारसायकल नदीत कोसळून दोघांचा मृत्यू-अहेरीनजीकच्या वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीघाटावरील घटना             डॉ.रमेश गजबे असतील वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार-चिमूरच्या सभेत अॅड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा             जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागात गारपिटीमुळे रब्बी पिकाचे नुकसान             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली ओबीसींवर अन्याय करणाऱ्या जीआरची होळी

Tuesday, 18th September 2018 01:28:18 PM

गडचिरोली, ता.१८: जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकरभरतीत केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देऊन ओबीसींवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली. शिवाय शहरातून बाईक रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदभरतीत शंभर टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात विविध संवर्गातील १३ पदांचा समावेश असून, गैरआदिवासींना वगळण्यात आले आहे. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी राज्य शासनाने एक परिपत्रक काढून आणखी ५ पदांची भर घातली आहे. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे व कार्याध्यक्ष किरण कटरे यांच्या नेतृत्वात आज इंदिरा गांधी चौकात ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत राहुल भांडेकर, दिनेश चापले, विकेश नैताम, संजय कुकुडकर, आदित्य डोईजड, परमानंद पुनमवार, प्रभाकर झरकर, प्रतीक डांगे, स्वप्नील घोसे, सचिन गेडाम, अंकित सोनटक्के, दिलीप नंदेश्वर, चेतन शेंडे, अक्षय चलाख, सुशांत मोहुर्ले, पंकज नंदगिरवार, संजित कोटांगले, जगन्नाथ चव्हाण, मनोज कोठारे, चरण भुरसे, पुष्पा करकाडे, नूतन कुंभारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार व लोकप्रतिनिधींविरुद्ध घोषणा देत संताप व्यक्त केला.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता आल्यानंतर  त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत तर केले नाहीच;उलट अधिसूचनेत पुन्हा पाच पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवून ओबीसी बेरोजगारांवर कुठाराघात केला आहे, अशी भावना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ओबीसी जनगणनेची आकडेवारी जाहीर करुन आरक्षण पूर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S4WE4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना