शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शिवसेना कार्यकर्त्यांसह युवकांचा भाजपात प्रवेश

Monday, 17th September 2018 07:58:32 AM

कुरखेडा, ता.१७: तालुक्यातील गेवर्धा-गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काल(ता.१६) गेवर्धा येथील ग्रामपंचायत सभागृहात भाजपाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली व आ.क्रिष्णा गजबे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी  शिवसैनिकांसह काही युवकांनी भाजपात प्रवेश केला. 

या बैठकीत गेवर्धा येथील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप नखाते, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद यांच्यासह रवी बाळबुद्धे, समीर जनबंधू, अमित पाखमोडे या युवकांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नाना नाकाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, सिनेट सदस्य चांगदेव फाये उपस्थित होते. यावेळी खा.अशोक नेते यांनी भाजपचा दुपट्टा देऊन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1UH55
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना