गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बजरंग दलाच्या चार कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Monday, 17th September 2018 07:39:36 AM

गडचिरोली, ता.१७: भाजपप्रणित बजरंग दल या संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी आज बजरंग दलाला रामराम ठोकत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बजरंग दलाचे प्रखंड संयोजक राकेश नैताम, प्रदीप वैरागडे, जगदीश डोमळे, अतुल लाटीलवार अशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची नावे आहेत. चौघांनीही आज आ.विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी 'जय श्रीराम' म्हणत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ.वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, युवा नेते डॉ.नितीन कोळवते, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, युवा नेते कुणाल पेंदोरकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5P5AK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना