बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नगरी येथील शेतकर्‍याचा डोहात बुडून मृत्यू

Friday, 24th October 2014 12:42:36 AM

 
गडचिरोली, ता़२३
नाल्यावर म्हशी धूत असताना डोहात बुडाल्याने युवा शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २३ आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नगरी येथे घडली़ जगन्नाथ वासू बांगरे(३८) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे़

जगन्नाथ बांगरे व अन्य काही नागरिक गुरुवारी दुपारी गावाशेजारच्या नाल्यावर म्हशी धुण्यासाठी गेले होते़ दरम्यान सहकार्‍यांच्या म्हशी धु्ऊन झाल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला़ मात्र, जगन्नाथ म्हशी धूतच होता़ एवढ्यात खोल पाण्यात बुडाल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला़ ही बाब माहित होताच सहकार्‍यांनी गावकर्‍यांना बोलावून जगन्नाथला बाहेर काढले़ त्यावेळी तो जिवंत होता़ मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला़ या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4V4D0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना