शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

दरवाढीविरोधातील बंदला गडचिरोली जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद

Monday, 10th September 2018 01:21:08 PM

गडचिरोली, ता.१०: पेट्रोल,डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केल्याच्या विरोधात आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य समविचारी पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. 

गडचिरोली येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी खासदार मारोतराव कोवासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेद्र ब्राम्हणवाडे, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, महासचिव प्रभाकर वासेकर, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, रजनीकांत मोटघरे, नीतेश राठोड, कुणाल पेंदोरकर, पुरुषोत्तम मसराम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर बारापात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शहरात रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दुकानदारांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन सरकारविरोधात घोषणा दिल्या. सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीणे असह्य झाल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

 

धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, सिरोंचा, एटापल्ली इत्यादी ठिकाणीही बंद पाळून दरवाढीचा निषेध करण्यात आला. कोरची व एटापल्ली येथे कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त केला. काही तालुकास्थळी मात्र बंदबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही. अहेरी येथे बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तसाही आज तान्हा पोळा हा 'मोठा' सण असल्याने व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे यंदाही बंद ठेवली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना बंदसाठी फार धावपळ करावी लागली नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5RVWE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना