शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

कोठी-अहेरी बस उलटली;११ प्रवाशांना दुखापत

Sunday, 9th September 2018 01:26:18 AM

भामरागड, ता.९: तालुक्यातील कोठी येथून अहेरीच्या दिशेने निघालेली बस कारमपल्ली वळणावरील रस्त्याच्या कडेला उलटल्याने ११ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.

काल(ता.८) अहेरी आगाराची एमएच ०६एस-८८२५ क्रमांकाची बस कोठी येथे गेली होती. तेथे मुक्काम केल्यानंतर ही बस आज सकाळी प्रवासी घेऊन निघाली. मात्र, वाटेत कारमपल्ली वळणावर ती रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे ११ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जेथे बस उलटली; त्या ठिकाणच्या रस्ता अतिवृष्टीमुळे दुभंगला होता. त्याची डागडुजी करण्यासाठी माती टाकण्यात आली. परंतु ती दाबण्यात आली नाही. त्यामुळे बसची चाके मातीत फसली आणि ती एका कडेला पलटली. बसच्या चालकाची प्रकृती बरी नव्हती, असेही सांगण्यात येत आहे. अपघात होताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जखमींना नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
01U9U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना