शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

महिला काँग्रेस कमिटीने केला राम कदम यांचा निषेध

Saturday, 8th September 2018 02:47:00 PM

गडचिरोली, ता.८: मुली पळवून आणण्यास मदत करेन, या भाजपचे आ.राम कदम यांच्या वक्तव्याचा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आज निदर्शने करुन निषेध केला.

इंदिरा गांधी चौकात जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांचे बॅनर लावून जोडे मारा आंदोलन केले आणि फोटोला शेण फासले. महिलांविषयी अनुद्गार काढणे हीच भाजपची संस्कृती झालेली आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावले. काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्यां.डॉ.चंदा कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा भडके, कल्पना नंदेश्वर , दीपा माळवणकर, आशा मेश्राम, मंजू आत्राम, सपना गलगट, वर्षा कुलदेवकर, सुवर्णा उराडे, निळा निंदेकर, निर्मला गुरनुले, पुष्पा बाळेकरमकर, सुलोचना गेडाम, सौ. बोरकर, आरती कंगाले, निशा गेडाम यांच्यासह कुणाल पेंदोरकर, आरिफ कानोजे, पंकज बारसिंगे, तुषार मडावी, नुगेश शिडाम, ऩेताजी बांगरे,भास्कर ठाकरे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
374NP
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना