गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आ.वडेट्टीवारांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Thursday, 6th September 2018 05:37:17 AM

गडचिरोली, ता.६: काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपने दिलेली खोटी आश्वासने व निष्क्रिय धोरणाला कंटाळून या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, युवा नेते डॉ.नितीन कोडवते यांच्या मार्गदर्शनाखाली आ.वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा तिरंगा दुपट्टा देऊन युवकांचे स्वागत केले. गडचिरोली शहर, तसेच कनेरी, इंदाळा, पुलखल, मुरमाळी व धानोरा तालुक्यातील निमगाव येथील हे कार्यकर्ते आहेत. प्रवेश करणाऱ्यांमध्ये खरपुंडीचे सरपंच आनंदराव नैताम,कुलदीप लोणारे, विकास जुवारे, कालिदास जेंगठे, लोमेश गुरनुले, सचिन बारसागडे, लोकेश खोब्रागडे, अक्षय सोनटक्के, मनोज चिखराम, अतुल कोहपरे,

सागर सोनटक्के, महेश लटारे, रमजान शेख, शाहरुख शेख, शरफराज शेख, अतुल चिचमलकार, मोहिम कुरेशी, मुन्ना रामटेके, भास्‍र ठाकरे, अविनाश कायरकर, तुषार मडावी, नागेश सिडाम, अतुल लाटीलवार, अमोल भांडेकर, सूरज मेश्राम, अरविंद भोपये, तेजराम रायसिडाम, प्रशांत पेंदाम, निकेश पेंदाम, ज्ञानेश्वर कोडाप,लिंगाजी बांगरे, राहुल मेश्राम आदींचा समावेश आहे.

याप्रसंगी आ.वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र केले. भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारवर जनतेची प्रचंड नाराजी आहे. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतमालाला भाव नसणे यामुळे जनता त्रस्त असून, भाजप सरकारचे कशावरच नियंत्रण राहिलेलं नाही. नुसत्या हवेत गोष्टी करणे, भूलथापा मारणे हेच काम भाजप सरकार करत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत एकही लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठ्या उद्योजकांचे कर्ज या सरकारने माफ केले; पण शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सरकार करू शकले नाही. त्यामुळे महिला, शेतकरी व युवक या सरकारला त्रासले असून आता काँग्रेसकडे वळू लागले आहेत, असे आ. वडेट्टीवार म्हणाले. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्याना कधीही नाराज करणार नाही, अशी ग्वाही आ. वडेट्टीवार यांनी दिली. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर, आरिफ कनोजे, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, संदीप पुण्यपवार, संकेत बल्लमवार उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XS48Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना