शुक्रवार, 18 जानेवारी 2019
लक्षवेधी :
  जिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक             देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच             भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले             उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

युवतीवर सामूहिक बलात्कार, चार जणांना अटक

Tuesday, 4th September 2018 09:00:22 AM

गडचिरोली, ता,४: चामोशीनजीकच्या लालडोंगरी परिसरात एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. निखिल मंडल, महादेव बारई, राजेश डाकवा व स्वरुप मिस्त्री, चौघेही रा.कृष्णनगर अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित युवती व तिचा भावी पती हे २९ ऑगस्टला लालडोंगरी परिसरात बोलत होते. यावेळी आरोपींनी त्यांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिवाय पैशाचीही मागणी केली. युवतीचा भावी पती पैसे देण्यास तयार झाला. मात्र, दोन आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. तिसऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला, तर चौथ्याने तिघांना सहकार्य केला. ३१ ऑगस्ट रोजी पीडित मुलीने तत्कार केल्यानंतर १ सप्टेंबरला चामोर्शी पोलिसांनी चारही जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे घटनेचा तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३ दिवस माहिती लपवून ठेवली. याबाबत पत्रकारांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RT2H6
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना