शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

निसर्ग विज्ञानात साहित्यनिर्मितीचे मूळ तत्त्व:प्रा.डॉ.सुदर्शन दिवसे

Monday, 3rd September 2018 12:57:16 AM

 

कुरखेडा, ता.४: निसर्ग हाच मानवाचा गुरु, सखा व मित्र असून, मानवाच्या प्रगतीचा तो आधार आहे. अनेक शास्त्र व कलांच्या मुळाशी जसा निसर्ग आहे; तसाच साहित्यनिर्मितीच्या मुळाशीही निसर्गविज्ञान आहे, असे प्रतिपादन कोरपना येथील प्रा.डॉ.सुदर्शन दिवसे यांनी केले.

येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वाङ्मय मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानसत्रात ते बोलत होते. प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य पी.एस.खोपे हे होते. यावेळी प्रा.डॉ.दिवसे यांनी मराठीतील प्राचीन साहित्य ते नवदोत्तरी साहित्य यांच्यातील स्थित्यंतरे व त्यातील प्रवाहांचा आढावा घेतला. सांस्कृतिक व सामाजिक बदल यांची पwरकता, सामाजिक सुधारकांचे योगदान, भारतीय राजकारण, वैज्ञानिक दृष्टिकोन, बदलत जाणारी विविधांगी मूत्ये अशा अनेक विषयांवर त्यांनी आपल्या व्याख्यानात भाष्य केले. याप्रसंगी प्रा.डॉ.आदे, प्रा.झाडे, प्रा.शंभरकर, प्रा.महाजन, प्रा.तितिरमारे, प्रा.सातपुते, प्रा.देवरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालन सूरज रामटेके, तर आभारप्रदर्शन प्रा.उराडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्फराज पठाण, विकास पर्वते, शैलेश गायकवाड, आशिष दाणे, किरण नैताम, तरुण उईके, संजय मडावी, पंकज सयाम, कल्पना शेंडे, मयुरी दरवडे, आरती रासेकर, मनिषा सोनकुकरा, स्नेहा जराते, सोनाली सिडाम, उमेष जौंजाळकर, अक्षय काळबांधे, चमन गणभोईर आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
22P1J
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना