गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांनी केली दोघांची हत्या

Sunday, 2nd September 2018 12:15:01 AM

गडचिरोली, ता.२: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री छत्तीसगडमधील दोन इसमांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)उपपोलिस ठाण्यापासून १ किलोमीटर अंतरावरील ताडगुडामार्गावर घडली. सोनू पदा(३५)व सोमजी पदा(४०)दोघेही रा.उलिया,(बांदे, छत्तीसगड)अशी मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी काल सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले व नंतर त्यांची शस्त्राने गळा कापून हत्या केली. नक्षल्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलिस ठाण्यापासून उत्तरेस १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून ठेवले. आज सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा कयास आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6H4KW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना