गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

चोरट्यांनी पोर्ला येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम फोडले

Tuesday, 21st October 2014 07:55:28 PM

 
गडचिरोली, ता़२२
तालुक्यातील पोर्ला येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज २२ आॅक्टोबरच्या मध्यरात्री घडली़ यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मोठे गाव असून, येथे हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व अन्य कार्यालये आहेत़ त्यामुळे येथील कर्मचारी व नागरिकांच्या सोयीसाठी गावात काही वर्षांपूर्वी बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा सुरू  करण्यात आली़ ग्राहकांच्या मागणीनंतर तीन महिन्यांपूर्वी बँकेने एटीएम सुरू केले होते़ मात्र, योग्य जागेअभावी एटीएम मशिन बँकेतच ठेवण्यात आली होती़ दरम्यान आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचे मुख्य प्रवेशद्वार फोडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी मशिनचे एका बाजूचे झाकण तोडले़ मात्र, कोडची माहिती नसल्याने त्यांना मशिनमधील पैसे काढता आले नाही़ आज सकाळी काही नागरिकांना एटीएम तोडल्याची माहिती मिळताच त्यांनी ही बाब बँकेच्या अधिकार्‍यांना सांगितली़ त्यांनतर आज सकाळी साडेसात वाजता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3KEHV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना