बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

निमगाव येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार

Tuesday, 21st October 2014 08:23:28 AM

 

गडचिरोली,ता़२१

तालुक्यातील निमगाव येथील एक युवती ३ आॅक्टोबरच्या रात्री शौचास गेली असता तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे़ मात्र, याप्रकरणी तक्रार करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे़निमगाव येथील एक युवती ३ आॅक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गावाबाहेरील गुजनवाडी मार्गावर शौचास गेली असता गावातीलच शांताराम कोडाप, अनिल वरखडे, महेंद्र कोवे व विक्रम कुमोटी या चार जणांनी तिचे तोंड दाबले आणि दूर अंतरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला़ त्यानंतर नराधमांनी पीडित युवतीला शाळेजवळ सोडून हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकीही दिली़ दोन दिवसांनंतर हा प्रकार पीडित युवतीच्या मित्रांना माहित होताच त्यांनी तिला धीर देऊन पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला़ त्यानुषंगाने ५ आॅक्टोबरला पीडित युवती व तिच्या मित्रांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली़ दोन-तीन दिवसांनंतर तक्रारकर्ते एफआयआरची प्रत मागावयास पोलिस ठाण्यात गेले असता, तेथील पोलिस निरीक्षक वैभव माळी यांनी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून प्रत देण्यास नकार दिला़ असे करता करता २० आॅक्टोबरचा दिवस उजाडला़ कारवाई न झाल्याने पीडित युवती आपल्या आई-वडिलांसह धानोºयातील ज्येष्ठ नेते साईनाथ साळवे यांच्याकडे गेले़ श्री़साळवे यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर आरोपींवर आज २१ आॅक्टोबर रोजी भादंवि ३६३, ३४१, ३७६(ग), ५०६(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शशिकांत पवार करीत आहेत़ पीडित युवतीला गडचिरोली येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे पीएसआय वैभव माळी यांची न्यायीक चौकशी करावी, अशी मागणी साईनाथ साळवे यांनी केली आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
13H8W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना