गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेची हत्या

Sunday, 26th August 2018 01:53:54 AM

गडचिरोली, ता.२६: जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन एका इसमाने महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना काल(ता.२५)संध्याकाळी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे घडली. पाली गुंडरु मडावी(४२)असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सरजू बुकलू बोगामी(२४)यास अटक केली आहे.

पाली मडावी ही जादुटोणा करते, असा सरजूला संशय होता. त्यामुळे त्याने पालीचा काटा काढण्याचा निश्चय केला. काल पाली मडावी ही आपल्या शेतावर गेली होती. सरजू हादेखील तिच्या शोधात गेला. संध्याकाळच्या सुमारास त्याने धारदार शस्त्राने पालीची हत्या केली. लाहेरी पोलिसांनी आरोपी सरजू बोगामी याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. लाहेरी उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AZPNW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना