गुरुवार, 20 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

पोटेगाव येथून ९५ हजारांचा सुंगधित तंबाखू जप्त

Sunday, 26th August 2018 03:07:39 AM

गडचिरोली, ता.२६: अन्न व औषध प्रशासन आणि पोटेगाव पोलिसांनी २४ ऑगस्टला राजोली रोड पोटेगाव येथून  मोटारसायकलमधून तब्बल ९५ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन आणि पोटेगाव पोलिसांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान पोटेगाव येथील दादाजी उट्टलवार, मिथून बांबोळे व विनोद मडावी यांच्या मोटारसायकलमधून ७७ हजार २५० रुपये किमतीचा २०० ग्रॅम माझा हुक्का तंबाखू, ७००० रुपयांचा ईगल तंबाखू, १७०० रुपयांचा लेबल नसलेला तंबाखू व ९ हजार रुपये किमतीचा १२० ग्रॅम प्रिमियम तंबाखू असा एकूण ९४ हजार ९५० रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला.

पोलिस उपअधीक्षक(गृह)श्री.चौगावकर, पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त श्री.केकरे, गडचिरोलीचे सहायक आयुक्त श्री.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, नमुना सहायक तुकाराम गोडे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MQ700
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना