गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

Friday, 24th August 2018 12:15:59 AM

गडचिरोली, ता.२३: गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजप समर्थित शिक्षण मंच या संघटनेला जोराचा धक्का देत आपले वर्चस्व प्राप्त केले.

महाआघाडीचे डॉ.कीर्तिवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व अजय लोंढे हे उमेदवार विजयी झाले, तर प्रा.डॉ.पराग धनकर हे शिक्षण मंच संघटनेचे एकमेव उमेदवार निवडून आले.

महाआघाडीत यंग टीचर्स असोसिएशन, न्युटा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, सेक्यूलर आघाडी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन या पाच संघटनांचा सहभाग होता. व्यवस्थापन परिषदेसाठी पार पडलेल्या चार जागांसाठीच्या निवडणुकीत शिक्षण मंचने व्यवस्थापन गटातून संदीप पोशट्टीवार, तर महाआघाडीने डॉ.कीर्तिवर्धन दीक्षित यांना उमेदवारी दिली होती. त्यात पोशेट्टीवार यांना २९, तर दीक्षित यांना ३२ मते मिळाली. प्राचार्य गटातून शिक्षण मंचतर्फे प्राचार्य डॉ.अनिल कोरपनवार, तर महाआघाडीने प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना रिंगणात उतरविले होते. मुनघाटे यांनी ३२ मते मिळवून विजय संपादन केला. पदवीधर गटातून शिक्षण मंचने प्रशांत दोंतुलवार, तर महाआघाडीने अजय लोंढे यांना उमेदवारी दिली होती. लोंढे यांनी ३२ मते मिळूवन विजयश्री खेचून आणली. दोंतुलवार पराभूत झाले. शिक्षक गटातून शिक्षण मंचचे प्रा.डॉ.पराग धनकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले. त्यांनी महाआघाडीचे प्रा.प्रमोद शंभरकर यांचा पराभव केला. महाआघाडीतर्फे सिनेट सदस्य अॅड.गोविंद भेंडारकर हे स्थायी समितीवर निवडून गेले आहेत.

शिक्षण मंचचे उमेदवार निवडून यावेत यासाठी आमदार, खासदार व मंत्र्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1401E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना