शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा:आ.कृष्णा गजबे

Tuesday, 21st August 2018 06:41:52 AM

गडचिरोली, ता.२१: मागील दोन दिवसांपासून जिल्हाभर मुसळधार पाऊस कोसळल्याने कोरची, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांतील घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. यामुळे गोरगरीब नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.

मागील दोन दिवस सर्वत्र संततधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे कित्येक गावांतील नागरिकांची घरे क्षतिग्रस्त झाली. शेतीलाही मोठा फटका बसला. आ.गजबे यांनी काही गावांची पाहणी केली असता त्यांना अनेक घरे, गुरांचे गोठे क्षतिग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी संवाद साधून पंचनामा करण्याचे निर्देश दिले. पंचनामा करण्याची प्रक्रिया ताबडतोब राबवून शासनाला अहवाल सादर करावा व आपद्गस्तांना भरपाई दयावी, असे आ.कृष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आ.गजबे यांच्या निर्देशानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KUV80
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना