बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली

Monday, 20th August 2018 11:21:03 PM

गडचिरोली, ता.२०: हैदराबादवरुन गडचिरोलीकडे येणारी परिवहन महामंडळाची बस आज आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदिगावनजीकच्या नाल्यात कोसळल्याची घटना आज संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मात्र, नागरिकांनी प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने आलापल्लीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला नंदीगावनजीकचा नालाही ओसंडून वाहत आहे. काल गडचिरोली आगारातून गडचिरोली आगाराची एमएच १४- बीटी ५०६५ क्रमांकाची एशियाड हिरकणी ही बस हैदराबादला गेली होती. आज सकाळी हैदराबाद येथून निघालेली ही बस सिरोंचामार्गे गडचिरोलीकडे येण्यास निघाली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नंदीगाव येथील नाल्याच्या काठावर बस पोहचली. त्यावेळी पुलावर पाणी नव्हते. मात्र, नाल्यावरुन बस पार करीत असताना सुरुवातीलाच एका खड्ड्यात बसचे चाक अडकले. चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ना पुढे जात होती, ना मागे. एवढ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला. त्यामुळे चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी दोन्ही काठांवर नागरिक उभे होते. काही वाहनेही थांबली होती. नागरिकांनी  प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र, अचानक प्रवाह वाढल्याने बस पुरात वाहून जाऊ लागली. परंतु तेथे एका झाडाला ती अडकली. बस अजूनही पुरातच अडकलेली आहे. बसमध्ये २५ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NKELF
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना