गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

व्वारे कमळ! ३६ पैकी ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Monday, 20th October 2014 07:53:16 AM

 
गडचिरोली, ता़२०  
१९ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा होत असला, तरी तिन्ही विधानसभा क्षेत्रांत रिंगणात असलेल्या ३६ उमेदवारांपैकी तब्बल ३० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने ते पार हिरमुसले आहेत़ गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे़ आरमोरी क्षेत्रातील १२, तर अहेरी क्षेत्रातील ६ उमेदवारांनाही त्यांची अनामत रक्कम वाचवता आलेली नाही़ यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व बसपा उमेदवारांचा समावेश आहे़

जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी व अहेरी या तीन विधानसभा क्षेत्रांमधून तब्बल ३६ उमेदवार रिंगणात होते़  त्यापैकी गडचिरोलीतून भाजपाचे डॉ़देवराव होळी, आरमोरीतून कृष्णा गजबे, तर अहेरीतून राजे अम्ब्रिशराव आत्राम विजयी झाले़ उर्वरित ३० उमेदवारांची अनामत जप्त झाली़ अनामत रक्कम वाचविण्यासाठी एकूण मतदानाच्या एक सष्टांश मते मिळणे आवश्यक आहे़ परंतु या क्षेत्रातून निवडणूक लढविणाºया १३ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक सष्टांश मते न मिळाल्याने त्यांची अनामत जप्त झाली़ यात राष्टÑवादीच्या काँगे्रसच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम, काँग्रेसच्या सगुणा तलांडी, शिवसेनेचे  केसरी उसेंडी, बसपाचे विलास कोडापे, भारिप-बमसंच्या कुसूम आलाम, मनसेच्या रंजिता कोडाप, अपक्ष जयश्री वेळदा, सुनंदा आतला, दिवाकर पेंदाम, नारायण जांभुळे, मोरेश्वर किन्नाके व देविदास मडावी या उमेदवारांचा समावेश आहे.

आरमोरी विधानसभा मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. येथे भाजपाचे उमेदवार कृष्णा गजबे विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम हे ४७ हजार ६८० मते मिळवून दुसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना आपली अनामत रक्कम वाचविता आली़ मात्र, इतर १२ उमेदवारांना कमी मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली़ यात बसपाच्या उमेदवार कोमल ताडाम, शिवसेनेचे डॉ.रामकृष्ण मडावी, भाकपाचे हिरालाल येरमे, राष्टÑवादी काँग्रेसचे नारायण वट्टी, अपक्ष उमेदवार जयेंद्रसिंग चंदेल, नंदू नरोटे, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत तोडासे, अपक्ष उमेदवार मनेश्वर मडावी, अ‍ॅड.प्रतापशहा मडावी, अतुल गरमडे,अशोक कोकोडे, फॉरवर्ड ब्लॉकचे नारायण जांभुळे या उमेदवारांचा समावेश आहे.
अहेरी मतदारसंघातून ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या मतदारसंघात एकू ण ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. भाजपाचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम विजयी झाले, तर राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम, अपक्ष उमेदवार दीपक आत्राम हे अनुक्रमे दुसºया व तिसर्‍या क्रमांकावर राहिले. या दिग्गज उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यात यश आले. मात्र, काँग्रेचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे, बसपाचे उमेदवार रघुनाथ तलांडे,  शिवसेनेचे रामशहा मडावी, अपक्ष उमेदवार कैलाश कोरेत, दिनेश मडावी आणी संतोष आत्राम या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ECK15
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना