गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा: महिला माळी समाज संघटनेची मागणी

Saturday, 18th August 2018 06:03:05 AM

गडचिरोली, ता.१८: दिल्ली येथे भारतीय संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका महिला माळी समाज संघटनेने केली आहे.

तालुका महिला माळी समाज संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत दिल्लीतील जंतरमंतरवर संविधान जाळून देशद्रोही कृत्य करणाऱ्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली.

या बैठकीला गडचिरोली तालुका माळी समाज संघटनेच्या सचिव अल्का गुरनुले, ज्योती मोहुर्ले, चैताली चौधरी, कांता लोनबले, वंदना मोहुर्ले, ज्योती जेंगठे, उषा शेंडे, मनिषा निकोडे, संजिवनी कोटरंगे, कुसुम गुरनुले, गीता सोनुले इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
43UVD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना