बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कुणाल उंदिरवाडे गडचिरोलीचे नवे गटविकास अधिकारी

Friday, 17th August 2018 12:57:41 AM

गडचिरोली, ता.१७:राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल(ता.१६) परिविक्षाधीन प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १६ अधिकाऱ्यांना पूर्णवेळ गटविकास अधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. कुणाल उंदिरवाडे यांची गडचिरोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विकास सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी गट 'अ' आणि सहायक गटविकास अधिकारी गट 'ब' या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा २०१५ द्वारे निवड होऊन अनुक्रमे यशदा व वनामती या प्रशिक्षण संस्थांमध्ये दाखल झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यांची ज्येष्ठता निश्चित करुन पदस्थापना करण्यात आली आहे. पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये(नियुक्तीच्या पंचायत समितीचे ठिकाण कंसात दिले आहे) प्रशांत काळे(श्रीगोंदा, जि.अहमदनगर), राहुल म्हात्रे(तलासरी, जि.पालघर), राघवेंद्र घोरपडे(धुळे, जि.धुळे), समाधान सोनावणे(श्रीरामपूर, जि.अहमदनगर), उदयसिंह राजपूत(जाफ्राबाद, जि.जालना), प्रवीण सिनारे(श्रीवर्धन, जि.रायगड), श्रीकृष्ण वेणीकर(घनसावंगी, जि.जालना), प्रवीण सुराडकर(गंगाखेड, जि.परभणी), सचिन पानझडे(नांदुरा, जि.बुलढाणा),सुशील संसारे(कळंब, जि.पालघर), चंद्रकांत साबळे(आमगाव, जि.गोंदिया), कुणाल उंदिरवाडे(गडचिरोली, जि.गडचिरोली), विवेक जमदाडे(आर्वी, जि.वर्धा), शंकर धोत्रे(अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती), शशिकांत सोनावणे(जळगाव, जि.जळगाव), प्रणाली खोचरे(पातूर, जि.अकोला) यांचा समावेश आहे.

याशिवाय सहायक गटविकास अधिकारी गट 'ब' म्हणून रघुनाथ पांढरे(मोखाडा, जि.पालघर), शेखर देशमुख(सिरोंचा, जि.गडचिरोली), रोहिणी बनकर(गोरेगाव, जि.गोंदिया), प्राजक्ता भस्मे(ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), धीरज पाटील(लाखनी, जि.भंडारा),शरद कोकाटे(रिसोड, जि.वाशिम), स्वप्नील मगदूम(देसाईगंज,जि.गडचिरोली), सूरज मोहोर(गडचिरोली, जि.गडचिरोली)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांची नियुक्ती रिक्त पदांवर करण्यात आली आहे.

कोण आहेत कुणाल उंदिरवाडे

गडचिरोलीला लाभलेले कुणाल उंदिरवाडे हे मूळचे गडचिरोली येथील रहिवासी असून, त्यांनी अभियांत्रिकीमधील पदवी संपादन केली आहे. २०१५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली होती. परंतु मुलाखतीत त्यांचा क्रमांक घसरला होता. उंदिरवाडे यांनी बीडीओ म्हणून नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती व उपमुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून अमरावती जिल्हा परिषदेत सेवा दिली आहे. आता बीडीओ म्हणून गडचिरोलीवासीयांना स्थानिक व्यक्ती मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5FRF0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना