शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

पर्यावरण व आरोग्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक:डॉ.प्रमोद साळवे

Monday, 13th August 2018 06:41:37 AM

गडचिरोली, ता.१३:पर्यावरण संतुलन व प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुर्वेद उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी केले.

चातगाव येथील डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजच्या वतीने तेथील स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच प्रतापशहा मडावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर धंदरे, राजू मडावी, बाळासाहेब गायकवाड, संजय शेंडे, तानाबाई ठाकरे, पांडुरंग कुमरे उपस्थित होते.

डॉ.साळवे पुढे म्हणाले की, वृक्षारोपण करताना पर्यावरणपूरक व औषधी गुणधर्म असलेली झाडे लावल्यास त्याचा मानवी जीवनाला मोठा उपयोग होऊ शकतो. सिमेंटच्या इमारतींमुळे उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले असून, ते टाळण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक भक्तदास बुरेवार, प्रदीप बुरेवार, सुखदेव देवलवार, ताराचंद भोयर, हुसेन शेख, विनोद जांभूळकर, प्रफुल्ल साखरे, ईकबाल शेख, सचिन कातोरे, ईश्वर राऊत, घनश्याम लोखंडे, मोहसिन शेख, प्रफुल्ल कोसरे, रोशन करंडे उपस्थित होते

कार्यक्रमाचे संचालन मोनाली गडपडे, तर आभार प्रदर्शन अश्विनी अंबादे यांनी केले. . कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुश्मिता रॉय, प्रगती साळवे, प्रियंका सोयाम, मानसी साळवे, ओजस्विनी नरताम, काजल उडाण, अपोर्णा मंडल, पूजा वाकुडकर, मयुरी कुत्तरमारे, पूनम चरडुके, दीक्षा झाडे, मृणाली तोराम, मानसी चुनारकर, सोनिया कारकुरवार, वंदना मंडल आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1U7NJ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना