गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विनयभंग करणाऱ्या आरोपीस २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Saturday, 11th August 2018 04:45:12 AM

कुरखेडा, ता.११: विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कुरखेडा येथील न्यायालयाने २ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विलास विठोबा लोहंबरे रा.येरंडी, ता.कुरखेडा असे दोषी इसमाचे नाव आहे.

२४ मार्च २०१५ रोजी विलास लोहंबरे याने आपली छेड काढून विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने कुरखेडा पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी विलास लोहंबरे याच्यावर भादंवि कलम ३५४(अ)(२)अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन सहायक पोलिस उपनिरीक्षक क्रिष्णा सहारे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

काल(ता.१०)या प्रकरणाचा निकाल लागला. कुरखेडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी विलास लोहंबरे यास २ वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिन्याच्या कारावासाची शिक्ष ठोठावली. सरकारी वकील म्हणून श्री.नाकाडे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रभू पिलारे यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A7SVW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना