मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

आश्रमशाळांना साहित्य पुरवठा करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची तलवार

Thursday, 9th August 2018 03:34:17 AM

गडचिरोली, ता.९: अख्खे जग आज आदिवासी दिन साजरा करीत असताना काही कंत्राटदार गडचिरोली जिल्ह्यातील गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी घृणास्पद खेळ खेळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळांना केलेल्या साहित्य पुरवठ्यात मोठा घोळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अहेरी पोलिसांनी ५ पुरवठादारांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी काही बोगस पुरवठादारांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याने ते भयभीत झाले आहेत.

शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना कंत्राटदारांकरवी शैक्षणिक व विविध जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी निविदा काढून कंत्राट दिले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विकास विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच मोठा भ्रष्टाचार करुन आदिवासी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे. अहेरी आदिवासी विकास प्रकल्पात असा घोळ झाल्याचा संशय आल्यानंतर प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी  विस्तार अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी(शिक्षण) आदिवासी विकास सहयोगी यांची चौकशी समिती नेमली. यावेळी समितीला २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये पुरवठा केलेल्या किराणा, फळ व अन्यधान्य पुरवठ्याच्या पावत्यांमध्ये घोळ झाल्याचे निष्पन्न होताच त्यांनी पावत्या जप्त्‍ा केल्या. त्यात पुरवठा केलेल्या साहित्याच्या पावत्या व अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांना सादर केलेल्या पावत्यांमध्ये तफावत आढळून आली. ही वाढीव रक्कम हडपण्यात आल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन अहेरी पोलिसांनी श्वेता इंटरप्रायजेस अमरावती, महिला गृहउद्योग सटाणा, सोनूमोनू इंडस्ट्रिज नागपूर, केंद्रीय भांडार पुणे, शिवम मिल्क अँड सप्लायर्स नाशिक या संस्थांच्या संचालकांवर कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

नाशिक, पुणे, नागपूर येथील हे पुरवठादार असून, ११ पैकी ९ जणांनी पावत्यांमध्ये केला घोळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच होतो भ्रष्टाचार

आश्रमशाळांना साहित्य पुरवठा करणारे कंत्राटदार आदिवासी विकास विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच आपली पोळी शेकून घेत असतात. या अधिकाऱ्यांना मोठ्या रकमा पोहचविणे, त्यांची सरबराई करणे, त्यांना गाड्यांची व्यवस्था करणे अशी कामे हे कंत्राटदार करीत असतात. त्यामुळेच विद्यार्थी उपाशी आणि कंत्राटदार व अधिकारी तुपाशी, असा प्रकार घडतो. गडचिरोली प्रकल्पातही यापूर्वी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सकाळी प्रकल्प कार्यालयात साहित्य नेऊन ठेवणे, संध्याकाळी ते साहित्य परत आणणे आणि दुसऱ्या दिवशी तेच साहित्य पुन्हा प्रकल्प कार्यालयात नेऊन ठेवण्याचे प्रकार यापूर्वी झाल्याची उदाहरणे आहेत. या प्रकरणांचीही चौकशी झाल्यास अनेक बडे मासे कारवाईच्या फासात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भ्रष्ट कंत्राटदारांना कोणते अधिकारी सहकार्य करतात, त्यांच्यावरही वॉच ठेवणे आवश्यक आहे. डॉ.सचिन ओम्बासे यांनी गडचिरोली प्रकल्पातील असे कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YS540
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना