गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

......अन् शौचालयांसह बाथरुमही घुसली जमिनीत!

Wednesday, 8th August 2018 08:12:38 AM

बंडू हरणे/धानोरा,ता.८:पावसामुळे कुणाची भिंत पडली, तर कुणाचे घर पडले अशा बातम्या आपण वाचत असतो. मात्र, धानोरा येथे शौचालयांच्या बाबतीत वेगळाच प्रकार घडला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धानोरा येथील तीन शौचालये व तीन बाथरुम चक्क जमिनीत घुसल्याची घटना घडली.

धानोरा येथील प्रभाग क्रमांक १४ मध्ये वास्तव्य करीत असलेले सुरेश तोरे, गणेश तोरे व किरण धुर्वे यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर पंचायतीकडून शौचालये मंजूर झाली होती. त्यानंतर तिघांनीही विहीत मुदतीत शौचालयांचे बांधकाम केले. परंतु काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे जमीन दलदल झाली. विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यामुळे दलदल आणखीनच वाढली. अशातच आज सकाळी तिन्ही शौचालये व बाथरुम जमिनीत अर्धवट गाडली गेली. त्यावेळी एक महिला बाथरुममध्ये आंघोळ करीत होती. शौचालये व बाथरुम जमिनीच्या आत शिरत असल्याचे लक्षात येताच एकच गोंधळ झाला. नागरिकांनी तिला सुखरुप बाहेर काढले. 

घटनेची माहिती मिळताच नगर पंचायतीचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती बाळू उंदिरवाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधितांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
F5M6I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना