रविवार, 16 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  जादुटोण्याच्या संशयावरुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास पाच वर्षांचा सश्रम कारावास-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             धानाच्या योग्य हमीभावासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष करावा: गुरवळा येथील कार्यक्रमात शेकाप नेत्या जयश्री वेळदा यांचे आवाहन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

गुरुजींचीच दांडी; कुलूप ठोकल्याने बांधगावची शाळा तीन दिवसांपासून बंद

Wednesday, 8th August 2018 12:55:16 PM

कुरखेडा,ता.८:गुरुजीच वारंवार शाळेला दांडी मारत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असतानाही शिक्षण विभाग कुठलीच दखल घेत नसल्याने पालकांनी सोमवारी(ता.६) बांधगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. यामुळे तीन दिवसांपासून ही शाळा बंद आहे.

कुरखेडा पंचायत समितींतर्गत बांधगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून, तेथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. परंतु कधी एक, तर कधी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर राहत असतात. यामुळे अनेकदा शाळा वाऱ्यावर सोडली जाते. यासंदर्भात पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली. परंतु तक्रारीची दखल घेणारा वाली कुणीच मिळाला नाही. अशातच सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली. मात्र, शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरू असलेला गोंगाट ऐकून पालकांनी शाळेकडे धाव घेतली. गुरुजी दुपारपर्यंत तरी विद्यार्थ्यांना दर्शन देतील, अशी आशा ठेवून पालक दुपारी २ वाजतापर्यंत त्यांची वाट बघत होते. परंतु शाळेला गुरुजींचा पदस्पर्श झाला नाही. अखेर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. 

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून बांधगाव येथील शाळा बंद असली, तरी या गंभीर बाबीची शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.  

याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.उरकुडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता गैरहजर असणाऱ्या शिक्षकांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्याची करवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9ZC6T
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना