मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून, आरोपीचाही मृत्यू

Tuesday, 7th August 2018 03:17:15 PM

कुरखेडा,ता.७: दारूच्या नशेत मित्राने मित्राच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील चिनेगाव येथे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अरुण देवाजी जुमनाके(४०) असे मृतकाचे नाव असून, पुंडलिक सिडाम(५०) रा.चिनेगाव असे आरोपीचे नाव आहे. आरोपीही मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास अरुण जुमनाके व पुंडलिक सिडाम यांच्यामध्ये दारूच्या नशेत बाचाबाची झाली. यावेळी पुंडलिक सिडाम याने अरुण जुमनाकेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. रक्तबंबाळ अवस्थेत अरुण स्वतःच्या घरी जाताच गतप्राण झाला. इकडे आरोपी पुंडलिक सिडाम हादेखील रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती चिनेगावच्या पोलिस पाटलांनी भ्रमणध्वनीवरून कुरखेडा पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिसानी घटनास्थळी दाखल होऊन जखमी अवस्थेत असलेला आरोपी पुंडलिक सिडाम यास कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VN4HM
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना