शनिवार, 18 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता, याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गडचिरोलीत मागणी             घरी निद्रावस्थेत असलेल्या निलंबित पोलिसांवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार, शिपायाची प्रकृती चिंताजनक-अहेरी येथील घटना             संविधान जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-गडचिरोली तालुका महिला माळी समाज संघटनेची मागणी             रानमांजराची शिकार करणारे चार जण ताब्यात-गडचिरोलीच्या वनाधिकाऱ्यांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
97%
नाही :
3%

जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्टला स्थानिक सुटी जाहीर

Tuesday, 7th August 2018 02:53:16 PM

गडचिरोली,ता.७ आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिनी ९ ऑगस्ट रोजी सुटी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी वारंवार केली होती. ती मान्य झाली असून जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आपल्या अधिकारात स्थानिक सुटीच्या आदेशात अंशत: बदल करीत गुरुवार ९ ऑगस्ट २०१८ रोजी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. 

आता जिल्हयातील सर्व कार्यालये, शाळा, शासकीय संस्था यांना जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट, पोळा या सणाचा दुसरा दिवस १० सप्टेंबर, आणि सर्वपित्री दर्श अमावस्या ८ ऑक्टोबर या दिवशी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

उपरोक्त आदेश गडचिरोली जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, अधिकोष (बँक) यांना लागू होणार नाही, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी दिली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
T444G
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना