मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश भांडेकर, सचिवपदी मनोज ताजणे

Tuesday, 7th August 2018 02:01:23 PM

गडचिरोली,ता.७: गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दै. 'पुण्य नगरी'चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, तर सचिवपदी दै. लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

गडचिरोली प्रेस क्लबची वार्षिक आमसभा नुकतीच पार पडली. यात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष अरविंद खोब्रागडे (नवभारत), सहसचिव रुपराज वाकोडे (दैनिक भास्कर), कोषाध्यक्ष नंदकिशोर काथवटे (तरुण भारत), सदस्य सर्वश्री रोहिदास राऊत (हितवाद), सुरेश पद्मशाली (आदिवासी माणूस), सुरेश सरोदे (लोकसत्ता), शेमदेव चाफले (युवाराष्ट्र दर्शन), मारोती मेश्राम (युगधर्म), सुरेश नगराळे (सकाळ), अनिल धामोडे (देशोन्नती), विलास दशमुखे (गडचिरोली पत्रिका), जयन्‍त निमगडे (गडचिरोली वार्ता), नीलेश पटले (लोकशाही वार्ता), सुनील चौरसिया (लोकमत समाचार) यांचा समावेश आहे. प्रेस क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती व पत्रकारांना मार्गदर्शन करण्याचा मनोदय नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E4L00
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना