मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

बीडीओला जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यास २ वर्षांचा सश्रम कारावास

Friday, 3rd August 2018 07:33:36 AM

गडचिरोली, ता.३: संवर्ग विकास अधिकाऱ्यास जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र मुप्पीडवार, असे दोषी इसमाचे नाव असून, तो सिरोंचा पंचायत समितीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आहे.

ही घटना आहे १६ जानेवारी २०१६ ची. या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी रवींद्र मुप्पीडवार हा संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरसकोल्हे यांच्या निवासस्थानी गेला. रवींद्रने श्री.मरसकोल्हे यांना झोपेतून उठवून 'माझ्याकडे प्रभार का दिला नाही', अशी विचारणा करुन त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय मारण्याची धमकीही दिली. लागलीच बीडीओ मरसकोल्हे यांनी सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रवींद्र मुप्पीडवार याच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या सहकलम ३(१)(१०) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढे २२ ऑगस्ट २०१६ रोजी रवींद्र मुप्पीडवार यास अटक करण्यात आली. सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

१ ऑगस्ट २०१८ रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. सरकारी पक्षाने फिर्यादी व इतर साक्षदारांचे बयाण नोंदविल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी रवींद्र मुप्पीडवार यास भादंवि कलम ५०६ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4E57N
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना