शनिवार, 18 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  वैभव राऊत कुणावर बॉम्ब टाकणार होता, याचा खुलासा तपास यंत्रणेने करावा-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गडचिरोलीत मागणी             घरी निद्रावस्थेत असलेल्या निलंबित पोलिसांवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार, शिपायाची प्रकृती चिंताजनक-अहेरी येथील घटना             संविधान जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-गडचिरोली तालुका महिला माळी समाज संघटनेची मागणी             रानमांजराची शिकार करणारे चार जण ताब्यात-गडचिरोलीच्या वनाधिकाऱ्यांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
97%
नाही :
3%

कोकोटी जंगलात चकमक;नक्षल साहित्य जप्त

Wednesday, 1st August 2018 02:12:39 PM

गडचिरोली, ता.१: एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत कोकोटी जंगलात आज दुपारी पोलिसांची नक्षल्यांशी चकमक उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सध्या नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु असल्याने कोटमी पोलिस मदत केंद्रातील पोलिस नक्षल शोध मोहीम राबवीत होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास कोकोटी गावानजीकच्या जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. या चकमकीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल पत्रके, पिट्टू, वॉकिटॉकी व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0D4PT
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना