गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पीएचसीतील औषध निर्माण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 31st July 2018 06:43:09 AM

गडचिरोली, ता.३१: प्रसूती रजा काळातील रकमेचे देयक मंजूर करुन दिल्याचा मोबदला म्हणून आरोग्यसेविकेकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी(वर्ग ३) श्रीनिवास व्यंकटय्या गटला(४६) यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती महिला ही मोयाबीनपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहे. ती प्रसूती रजेवर गेली होती. रजेवरुन परत येताच तिने रजा काळातील रकमेचे देयक सादर केले. हे देयक मंजूरही झाले. परंतु देयक मंजूर केल्याचा मोबदला म्हणून औषध निर्माण अधिकारी श्रीनिवास गटला याने तिला २ हजार ४०० रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्तीची मुळीच इच्छा नसल्याने तिने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता, औषध निर्माण अधिकारीउ श्रीनिवास गटला यास तक्रारकर्तीकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(ड) व सहकलम १३(२)अन्वये सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडीकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R1RU0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना