मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी १ ऑगस्टला करणार आष्टी परिसराचा दौरा

Tuesday, 31st July 2018 01:17:54 PM

गडचिरोली, ता.३१: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी हे बुधवारी १ ऑगस्ट रोजी आष्टी व गणपूर बोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा दौरा करणार आहेत.

काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष विनोद खोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.नामदेव उसेंडी हे कोनसरी, उमरी, चंदनखेडी, अनखोडा, कढोली, जैरामपूर, गणपूर, मुधोली, विठ्ठलपूर, लक्ष्मणपूर, दुर्गापूर या गावांना भेटी देणार आहेत. भेटीदरम्यान ते बूथ कमिटी गठित करणे, ग्राम काँग्रेसची स्थापना करणे, तसेच काँग्रेसच्या शक्ती अॅप ८८२८८४३०१० व मतदारांची वोटर आयडी एसएमएस करुन त्यांना पक्षाशी जोडण्यावर भर देणार आहेत. यासाठी सर्व मतदार व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापले मतदान ओळखपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, जिल्हा महासचिव राजेश ठाकूर, नगरेसवक सुमेध तुरे, गडचिरोली विधानसभा समन्वयक वैभव भिवापुरे, चामोर्शी तालुका बूथ समन्वयक प्रमोद भगत यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X46L4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना