शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

क्लेमोर माईनचा स्फोट;बालंबाल बचावले पोलिस

Monday, 30th July 2018 07:13:38 AM

गडचिरोली, ता.३०: शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आज नक्षल्यांनी क्लेमोर माईनचा स्फोट घडवून पोलिसांचा घात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने पोलिसांना कुठलीही इजा झाली नाही. ही घटना आज सकाळी रेगडी-गरंजी मार्गावर घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासपल्ली फाट्यावर नक्षल्यांनी बॅनर बांधले होते. ही माहिती मिळताच रेगडी उपपोलिस ठाण्यातील पोलिस आज सकाळी सात वाजताच्या सुमारास विकासपल्ली फाट्याकडे पायी जायला निघाले. एक-दीड किलोमीटर अंतरावर जाताच एका नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात एक इसम संशयास्पद स्थितीत दबा धरुन बसलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला दुरुनच हटकले. लागलीच त्या इसमाने क्लेमोर माईनचा स्फोट घडवून पळ काढला. पोलिस जवळपास शंभर-दीडशे मीटर अंतरावर असल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. नक्षल सप्ताहादरम्यान दुर्गम भागात चोख पोलिस बंदोबस्त असल्याने सुरुवातीच्या दोन दिवसांत नक्षलवादी बॅनर बांधण्याशिवाय काहीही करु शकले नाही. मात्र, आज फार संवेदनशिल नसलेल्या रेगडी भागात क्लेमोर माइनचा स्फोट करुन पोलिसांचा घात करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AVC64
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना