मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

अविनाश धर्माधिकारी १ ऑगस्टला गडचिरोलीत करणार स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन

Sunday, 29th July 2018 01:56:57 PM

गडचिरोली, ता.२९: माजी सनदी अधिकारी व चाणक्य अकादमीचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांचे स्पर्धा परीक्षा व करिअरविषयक व्याख्यान १ ऑगस्टला गडचिरोलीत आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातील सुशिक्षित युवक, युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

आ.डॉ.देवराव होळी यांनी सांगितले की, फॉर्च्यून फाउंडेशन व चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अभिनव लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा  गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, शिक्षक आमदार नागो गाणार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर, नगराध्याक्ष योगीता पिपरे उपस्थित राहणार आहेत.

 फॉर्च्यून फाउंडेशननचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉ. देवराव होळी हे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत. 

गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रात अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणे, हे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  आ.डॉ देवराव होळी यांनी केले. 

पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ.भारत खटी, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, तालुका महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, जनार्दन साखरे, फुलचंद वाघाडे, हंसराज उराडे, सिद्धार्थ नंदेश्वर, देवानंद चलाख, निखिल चरडे, यांच्यासह कुणाल पडालवार, अभिजीत मोहुर्ले, चेतन गोरे, शैलेन्द्र खरवडे, संतोष बोलुवार, अनिल तिडके, आदित्य डोईजड, मयूर मोगरे, कल्पक चंद्रगिरे, गणेश ठवरे, महेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WXB1U
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना