सोमवार, 20 जानेवारी 2020
लक्षवेधी :
  चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात वाघिणीचा मृत्यू, भुकेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज             गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा वरचष्मा, काँग्रेसचा दारुण पराभव             गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य अपघातात गंभीर जखमी-कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावाजवळची घटना             प्रशासनाने घडविले गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 'इस्रो'चे दर्शन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

अन् नक्षल कमांडरच्या बापाने जीवंतपणीच काढली आपल्या मुलाची अंत्ययात्रा

Friday, 27th July 2018 01:03:29 PM

गडचिरोली, ता.२७: नक्षलवादी केवळ संशयावरुन निरपराध नागरिकांची हत्या करतात. झाडे पाडून रस्ता अडविणे, जाळपोळ करणे अशी कृत्येही सामान्य नागरिकांचे जिणे कठीण करतात. हे कुठवर सहन करायचे, या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या एका नक्षल कमांडरच्या बापाने आज एटापल्लीत जीवंतपणीच आपल्या मुलाची अंत्ययात्रा काढून नक्षल चळवळीला आपला विरोध दर्शविला.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करुन मृत नक्षल्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. या सप्ताहात हिंसक कारवायाही केल्या जातात. परंतु नक्षल्यांना कुणी सहकार्य करु नये, यासाठी एटापल्ली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ ते २७ जुलैदरम्यान एटापल्ली तालुक्यात जनमैत्री मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. यात नक्षलवादी गोरगरीब आदिवासी नागरिकांना कसा त्रास देतात, हे समजावून सांगण्यात आले. अनेक नागरिकांनीही नक्षल्यांमुळे आपणास त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली. कसनसूर उपपोलिस ठाण्यांतर्गत रेगडीगुट्टा येथील नक्षल कमांडर महेश उर्फ शिवाजी गोटा याचे वडील रावजी गोटा यांनाही राहवले नाही. त्यांनी चक्क दलममधील आपल्या मुलाची जीवंतपणीच अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले. त्यानुसार आज सकाळीच अंत्यविधीची तयारी करण्यात आली. तिरडीवर महेशचे प्रतिकात्मक प्रेत ठेवण्यात आले. खांदा देणारे लोकही तयार झाले. सकाळी साडेअकरा वाजता एटापल्ली येथील महसूल मंडळ कार्यालयातून नक्षल कमांडर महेश गोटाच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. नक्षल्यांचा डीव्हीसी जोगन्ना उर्फ घिूसू उर्फ चिमला उर्फ नरसय्या लिंगया रा.करीमनगर याचीही अंत्ययात्रा निघाली. नक्षलविरोधी घोषणा देत शहरातील मुख्य मार्गाने अंत्ययात्रा गेल्यानंतर शिवाजी चौकात दोन्ही नक्षल कमांडरच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. त्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करुन नक्षल्यांना सहकार्य न करण्याचे आवाहन करण्यात आले. या अंत्ययात्रेत गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अंत्ययात्रेदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, अमित पाटील, संजय राठोड, अरुण डोंबे, नवाज शेख यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BVF6J
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना