बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कारगिल युद्धातील शहिदांना गडचिरोलीवासीयांनी केले नमन

Thursday, 26th July 2018 01:24:29 AM

गडचिरोली,ता.२६: शहरातील कारगील चौकात आज कारगील विजय दिन साजरा करून युद्धातील शहीद भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

१९९९ मध्ये कारगिल येथे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते, या युद्धात पाकिस्तानच्या घुसखोर जवानांना शूर भारतीय सैनिकांनी हुसकावून लावले. त्यावेळी अनेक सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून भारत मातेचे रक्षण करताना शहीद झाले. याची आठवण म्हणून २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

 गडचिरोली शहरातील उदय धकाते हे नित्यनेमाने या दिवशी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने शहीद भारतीय सैनिकांना आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. आज झालेल्या कार्यक्रमास अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवून शूर जवानांना नमन केले. यावेळी मंडळाचे  अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक किशोर सोनटक्के, श्रावण कापगते, राजू पुंडलिकर, सदस्य श्याम कोल्हटकर, पितांबर पेंटर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे मार्गदर्शक माजी सैनिक कन्हैयासिंह बैस, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेश बिडकर, नरेश चन्नावार आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L1MFT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना