शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

स्वत:कडील रायफलची गोळी लागल्याने जवान जखमी

Monday, 23rd July 2018 07:05:07 AM

गडचिरोली, ता.२३:अनावधानाने स्वत:कडील रायफलमधील गोळी सुटून ती लागल्याने जवान जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. एस.एस.चव्हाण असे जखमी जवानाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, श्री.चव्हाण हे आज दुपारी बॅरेकमध्ये झोपले होते. उठल्यानंतर अनावधानाने रायफलला हात लागल्याने  अचानक गोळी सुटली आणि ती चव्हाण यांच्या पोटाला चाटून गेली. सहकाऱ्यांनी त्यांना सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तेलंगणा राज्यातील वारंगळ येथे हलविण्यात आले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5K848
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना