गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

इसमास पेट्रोल ओतून जाळणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा

Monday, 23rd July 2018 06:55:31 AM

गडचिरोली, ता.२३: एका इसमास आधी लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून पैशाची लूट करणाऱ्या व नंतर लग्नास नकार देऊन त्याला पेट्रोल ओतून जाळणाऱ्या आरोपी महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. असे सपना वासुदेव पांडे, रा.गडचिरोली असे दोषी महिलेचे नाव आहे.

गडचिरोली येथील आरोपी सपना पांडे हिने मोमीन सुबेद्दीन सिद्दीकी यास सुरुवातीला लग्न करण्याचे आमिष दाखविले. यामुळे मोमीन सिद्दीकी याने सपनाच्या भूखंडावर स्वत:च्या पैशाने तिला घर बांधून दिले. शिवाय पैसेही दिले. त्या घरी सपना, तिची मुले व मोमीन सिद्दीकी हे राहू लागले. परंतु कालांतराने सपनाने मोमीनशी लग्न करण्यास टाळाटाळ करुन त्याला घरातून हाकलून दिले. यामुळे मोमीन हा सपनाला पैशाची मागणी करु लागला. यामुळे सपनाने चिडून मोमीनला २९ एप्रिल २०१५ रोजी संध्याकाळी ६ वाजता पैसे देणार असल्याचे सांगून घरी बोलावले. मोमीन तिच्या घरी पोहचताच सपनाच्या मुलाने त्याचा हात पकडला आणि तिने मोमीनच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जीवंत जाळले. मोमीन आपला जीव वाचविण्यासाठी आयटीआय चौकापर्यंत धावला. यावेळी परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला.

तपास पूर्ण झाल्यावर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक जयंत मुनगेलवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सपना वासुदेव पांडे हिला भादंवि कलम ३०२ अन्वये आजीवन कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त सश्रम कारावास ठोठावण्यात आला. 

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NX8AJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना