शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई दुधबळे यांचे निधन

Monday, 23rd July 2018 09:34:10 AM

गडचिरोली, ता.२३: जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई तामदेव दुधबळे यांचे काल(ता.२२)रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले.

चामोर्शी येथील रहिवासी असलेल्या संध्याताई दुधबळे ह्या १९९९ मध्ये सर्वप्रथम शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यावेळी त्यांना जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२ या कालावधीत त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर त्या पुन्हा निवडून आल्या. २०१२ मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्यांचे पती डॉ.तामदेव दुधबळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

आज सकाळी संध्याताईंचे पार्थिव चामोर्शी येथे आणण्यात आले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी पंचायत समिती सभापती किसनराव शेट्ये, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, नगरसेवक प्रमोद वायलालवार, नगरसेवक वैभव भिवापुरे, विजय शांतलवार, सुमेध तुरे, प्रशांत येग्लोपवार, भाजप नेते केशव भांडेकर, आनंद भांडेकर, स्वप्नील वरघंटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश ताकसांडे यांच्यासह अनेक चाहते उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3GFDW
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना