गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सीआरपीएफ जवानाने उगारली दुकानदारावर बंदूक

Saturday, 18th October 2014 08:04:05 AM

 
गडचिरोली, ता़१८
मोबाईल दुरुस्तीचे बिल मागितले म्हणून केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने चक्क दुकानदारावरच बंदूक उगारल्याची घटना आज (ता.१८) देसाईगंज येथे घडली़
विधानसभा निवडणुकीसाठी अन्य जिल्ह्यातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती़ केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचाही त्यात समावेश होता़ काही जवान देसाईगंज येथे थांबले होते़ आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक जवान देसाईगंज येथी साई मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानात मोबाईल दुरुस्तीसाठी गेला़ दुकानदाराने मोबाईल दुरुस्त केल्यानंतर त्या जवानाला बिल दिले़ मात्र, बिलाची रक्कम न देताच तो जवान परत जाऊ लागला़ त्यामुळे पुन्हा दुकानदाराने त्याला विनंती केली़ परंतु जवान ऐकण्यास तयार नव्हता़ दुकानदाराने त्याच्या जवळ जाऊन पैसे देण्याची विनंती केली़ मात्र, कशाचे पैसे म्हणून जवानाने दुकानदारावरच बंदूक उगारली़ शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले़ पोलिसांनी दोघांचीही समजूत घालून प्रकरण मिटविले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
540TO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना