सोमवार, 22 ऑक्टोबर 2018
लक्षवेधी :
  बोलेरो वाहनाच्या बालिका ठार, सिरोंचा तालुक्यातील बामणी येथील घटना             भारनियमन तत्काळ बंद करुन पीक वाचवा;अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकू-शेतकरी कामगार पक्षाचा इशारा             शिवसैनिकांची देसाईगंजच्या एसडीओ कार्यालयावर धडक, थेट अनुदान धोरणाचा केला विरोध             घरपोच दारूबाबत राज्य शासनाने स्त्रियांना आश्वस्त करावे-उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांची मागणी             बहुजन महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नाही-संभाजी ब्रिगेडचा इशारा             कोंबडपार जंगलात पोलिस-नक्षल चकमक, एका नक्षल्याला कंठस्नान             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

पहिल्याच पावसात वाहून गेला कोल्हापुरी बंधारा

Thursday, 19th July 2018 12:23:02 PM

कुरखेडा,ता.१९: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुरखेडा येथील जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभागामार्फत बांधण्यात आलेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. यामुळे सिंचन विभागाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुक्यातील चिरचाडी गावालगत असलेल्या नाल्यावर २००७ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला होता. या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे नुतनीकरण करून नवीन पद्धतीने २०१८ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधताना नाल्याच्या एकाच बाजूला सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला दगडाची पिचिंग करण्यात आली. तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दगडाची पिचिंग पार उखडून गेली आणि बंधाऱ्याच्या एक भाग पाण्यात वाहून गेला. बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पहिल्याच पावसात हा बंधारा वाहून गेला. परिणामी शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या बांधकामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिंचन विभागाच्या वतीने सन २०१७-१८ या वर्षात महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत कुरखेडा व कोरची तालुक्यातील २३ माजी मालगुजारी तलावांमधील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. या प्रकरणात इंधनावर बेसुमार खर्च दाखवून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला. शिवाय कामही दर्जेदार झाले नाही. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्यावर आर्थिक गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेऊन राज्य शासनाने त्यांना नुकतेच निलंबित केले आहे. ही बातमी ताजी असतानाच ठिकठिकाणी बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामात अजिबात सुधारणा झालेली नाही.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
04045
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना