शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

चालकाच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावले प्रवासी

Tuesday, 17th July 2018 06:48:09 AM

कुरखेडा, ता.१७: मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले. 

मानव विकास मिशनची एमएच ०६-८८७१ क्रमांकाची बस कुरखेडा तालुक्यातील शेड्यूल आटोपून गडचिरोलीला परत जात असताना कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक गाडीचे स्टेअरिंग निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालक सुखदेव सयाम यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली. यामुळे मोठा अपघात होता होता टळल्याने प्रवासी अपघातातून बचावल्याची माहिती या बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली.  नादुरुस्त गाडीतील प्रवाशांना ब्रम्हपुरी आगाराच्या एमएच ४०-९९२२ क्रमांकाच्या कुरखेडा-देसाईगंज बसमध्ये पुढील प्रवासासाठी बसविण्यात आले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर गुरनोली फाट्याजवळ याही बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती थांबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.

 

        


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EZUB6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना