गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नक्षल्यांनी केली अपहृत इसमाची हत्या

Monday, 16th July 2018 11:34:03 PM

गडचिरोली, ता.१६: पाच दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एका इसमाची नक्षल्यांनी गोळी घालून हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. चंद्रा दल्लू कवडो(४०)रा.रामनटोला, ता.एटापल्ली असे मृत इसमाचे नाव आहे.

चंद्रा कवडो याचा मृतदेह आज छत्तीसगड राज्यातील पाखांजूर तालुक्यातील बांडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताळबैली गावानजीक आढळून आला. रामनटोला हे गाव गडचिरोली जिल्हा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैला काही नक्षली रामनटोला गावात गेले होते. त्यांनी गावातील दोन इसमांना डोंग्याने नदीपलिकडील छत्तीसगड राज्यात आपल्या सोबत नेले होते. त्यात चंद्रा कवडो याचाही समावेश होता. त्यातील एका जणाला नक्षल्यांनी दुसऱ्या दिवशी सोडले. परंतु चंद्रा कवडो हा परत आला नव्हता. आज बांडे परिसरातील ताळबैलीच्या जंगलात चंद्रा कवडो याचा मृतदेह आढळून आला. 

चंद्रा कवडो हा आपल्या विरोधकांना सहकार्य करतो, अशा संशयावरुन नक्षल्यांनी त्याची हत्या केल्याचा अंदाज आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RTRH4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना