मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकत आहेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख

Friday, 13th July 2018 03:21:42 PM

गडचिरोली, ता.१३:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी जिल्ह्याचा दौरा करुन शिवसेनेसाठी रक्त आटवणाऱ्या; पण सदय:स्थितीत पक्षापासून दूर असलेल्या चार निष्ठावंतांची भेट घेऊन पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न केला. पोतदार यांच्या प्रयत्नामुळे शिवसेना पुन्हा नवी उभारी घेईल, असे जाणकारांना वाटत आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्यासह नुकताच जिल्हा पिंजून काढला. या अभियानादरम्यान त्यांनी धानोरा येथील ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना चंदेल यांची भेट घेतली. यावेळी पोतदार यांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश समजावून सांगितले. यावर मुन्ना चंदेल हेही भारावून गेले. आपण मागील ३० वर्षांपासून नि:स्वार्थपणे शिवसेनेचे काम करीत असून, घरची भाकर खाऊंन धानोरा तालुक्यात गोरगरीब जनतेची सेवा करून शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्याचे काम केले. तालुकाप्रमुख असताना आपण धानोरा पंचायत समितीचे उपसभापती व जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. तसेच धानोरा तालुक्यातील ५० टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच बसविले. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या स्वळाबर निवडणूक लढविण्याच्या घोषणेला आपला पूर्ण पाठिंबा असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आण्यासाठी प्राणाची बाजी लावू, असे मुन्ना चंदेल यांनी संपर्कप्रमुखांना आश्वस्त केले.

यानंतर पोतदार यांनी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील ज्येष्ठ शिवसैनिक डॉ.सत्यविजय दुधबळे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. दुधबळे यांनी तालुकाप्रमुख असताना आपण ६० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंच, ४ जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती निवडून आणून तालुक्यात शिवसेनेचा दरारा निर्माण केला होता, असे सांगितले. वैद्यकीय व्यवसाय असल्याने आपला गोरगरीब जनतेशी संबंध येतो. त्याचा फायदा शिवसेनेच्या राजकीय वाढीसाठी झाला, असे सांगून डॉ. दुधबळे यांनी पक्षप्रमुखांच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला.

किशोर पोतदार यांनी आरमोरी येथील ज्येष्ठ शिवसैनिक श्रीरंग धकाते यांचीही भेट घेतली. मागील ३० वर्षांपासून आपण शिवसेनेचे काम करीत असून, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती असे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या काम केले. वेळोवेळी गोरगरीब शिवसैनिकांसाठी धावून गेलो. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राून १५ वर्षे शिवसेनेचा आमदार निवडून आण्यात आपली अपार मेहनत होती, असे श्रीरंग धकाते यांनी किशोर पोतदार यांना सांगितले. त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेचे स्वागत करुन यापुढे शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.

आरमोरी येथील दुसरे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर मने यांचीही किशोर पोतदार यांनी सदिच्छा भेट घेतली. आपण स्वत: जिल्ह्यात शिवसेनेची स्थापना केली. आरमोरी ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समिती सभापती, नागपूर निवड मंडळाचा सदस्य अशी महत्वपूर्ण पदे भूषवून जनसेवा केली. पूर्णवेळ काम केल्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला नाही. गोरगरीब जनतेची सेवा करत राहिलो. १५ वर्षे आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणण्यात आपला महत्वाचा वाटा होता, असे चंद्रशेखर मने यांनी किशोर पोतदार यांना सांगितले. शिवसेनेने स्वबळावरच निवडणुका लढवाव्यात. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे चंद्रशेखर मने म्हणाले. 

गेल्या काही वर्षांपासून शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत होते. परंतु संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी प्रथमच संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करुन जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने त्यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. हा उपक्रम शिवसेनेने पुढेही सुरु ठेवल्यास या जिल्ह्यात पुन्हा शिवसेना सत्तेच्या दिशेने वाटचाल करु शकेल, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
08LKC
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना