मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसने केला 'प्रोजेक्ट शक्ती' उपक्रमाचा शुभारंभ

Thursday, 12th July 2018 01:27:34 PM

गडचिरोली, ता.१२: ठिकठिकाणी राहणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जोडून त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या 'प्रोजेक्ट शक्ती' या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने नुकताच केला.

पक्षाच्या जिल्हा कार्यालयात काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांच्या नेतृत्वात 'प्रोजेक्ट शक्ती' चा शुभारंभ करण्यात आला. खेड्यापाड्यात राहणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी काँग्रेस पक्षाने 'प्रोजेक्ट शक्ती' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मोबाईलद्वारे काँग्रेस नेतृत्व आपला संदेश, नवनवीन कल्पना व सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविणार असून, कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेणार आहे. अ.भा.महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुस्मिता देव, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अँड.चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार व आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, महिला काँग्रेसच्या जिल्हा निरीक्षक नंदा अल्लूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

भारतातील महिलांना सन्मान मिळावा, विकासाच्या प्रवाहात त्यांनाही सामावून घ्यावे, देशाच्या राजकारणांत त्यांच्याही विचारांना स्थान मिळावे व त्यांची मतेही निर्णायक ठरावी, हा 'प्रोजेक्ट शक्ती' उपक्रमाचा उद्देश असल्याचे भावना वानखेडे यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत आपले विचार व कार्य पोहचविण्याची संधी जिल्ह्यातील महिलांना मिळेल, असेही भावना वानखेडे यांनी सांगितले.

याप्रसंगी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष सगुणा तलांडी, जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा भडके, कल्पना नँदेश्वर, देसाईगंज तालुकाध्यक्ष आरती लहरी, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कावे, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयश्री धाबेकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष तिरुमला दासरी, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष निराशा मेश्राम, गीता धाबेकर, मंजू आत्राम, आरती कंगाले, निशा गेडाम, गीता पित्तुलवार, माधुरी कूसराम, सपना गलगट, सुवर्णा उराडे, आशा मेश्राम यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बैठकीचे सूत्रसंचालन कल्पना नँदेश्वर यांनी केले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1H3GM
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना